thumb podcast icon

'Selfless' Parenting !!! [An exclusive Marathi podcast by Shilpa]

U • Educational

A MARATHI PODCAST where you can get to LISTEN LEARN many important things about PARENTING that really MATTERS In short, one stop solution for all your parenting concerns needs with your Host Shilpa InamdarYadnyopavit.इथे तुम्हाला पालकत्वाविषयी अनेक तज्ञ व्यक्तींचे पालकत्वाच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांवरचे interviews, tips , parenting वरील उपयुक्त पुस्तकांची माहिती , वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीने मुलांना वाढवलेल्या काही पालकांचे अनुभव , मुलांबरोबर आणि मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींविषयी माहिती आणि आणखीनही बरंच काही असणारे चला तर मग, सुरु करूया प्रवास अजाण ते सुजाण पालकत्वाचा  

  • Cultivating ‘Grand’ parenting with care !!! Ft. Prajakta Wadhavkar
    47 min 51 sec

    About social parenting of elders

  • Encouraging Endorsements Series Dr. Saurabh Gadgil
    2 min 18 sec

    Recommendations from the guests, friends and well wishers why one should listen to my podcast

  • Encouraging Endorsements Series - RJ Teju
    2 min 40 sec

    Endorsements from friends , guests on my podcast

  • शाळा नेमकी असते कशासाठी ? - with Rushikesh Dabholkar [Founder-Atakmatak.com, storyteller & freelance writer] Ep. 25
    37 min 46 sec

    घरात मूल जन्माला यायचा अवकाश पालकांना त्याच्या उज्वल भवितव्याविषयी निर्माण होणाऱ्या काळजीत शाळा हा फार महत्वाचा मुद्दा असतो त्यावरून घराघरांत काय घडतं ते वेगळं सांगायला नको ..आणि ते पूर्णतः चुकीचं आहे असंही नाही पण तरीही आपण आपल्या मुलासाठी एखादी शाळा का निवडतो त्यासाठी कुठले निकष पडताळतो अमुक शाळा माझ्या मुलासाठी बेस्ट असेल हे कुठल्या परिमाणांवर तपासतो असे अनेक प्रश्न बऱ्याच पालकांना पडलेलेच नसतात की फक्त so called reputed असणाऱ्या ठिकाणी पैसे भरणे हे एकच आपलं आद्यकर्तव्य आहे असं वाटू लागलंय हेच कळेनासं झालंय ...शाळा नेमकी असते कशासाठी हा प्रश्न कधी पडतो का आपल्याला पडला असेल आणि त्याचं उत्तर हवं असेल तर आजचा भाग नक्की ऐका या बद्दल अतिशय रास्त आणि सुयोग्य पद्धतीने विवेचन करून देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत ऋषिकेश दाभोळकर प्रोफेशनली इंजिनियर आणि पॅशनेटली लेखक , स्टोरीटेलर आणि बरंच काही मुलांसोबत आणि मुलांसाठी काम करायला खूप आवडतं म्हणून त्यांनी अटकमटक. कॉम ची निर्मिती केली. पालकनिती, चिकूपिकू अश्या मासिकांतून तसंच अक्षरनामा, ऐसी अक्षरे आदी अंकांमध्ये, लोकमत सारख्या वृत्तपत्रातून ते सातत्याने लिखाण करत असतात. गोष्टींचे अभिवाचन करणे, नाट्यमय सादरीकरण करणे, मुलांशी वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारणे या गोष्टी मनापासून करणारा मुलांचा लाडका ऋषिकेश दादा एक संवेदनशील कवी मनाचा बाबा देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया अशा या multi talented व्यक्तिमत्वाला आपल्या सेल्फलेस पेरेंटिंग च्या आजच्या भागात.... 

  • Dr. Sushma Kulkarni [Director- Rajarambapu Inst. of Technology] on Positive Parenting !!! Ep. 27
    8 min 15 sec

    globalparentsday Special episode नक्की ऐका  काल झालेल्या जागतिक पालक दिनाच्या निमित्ताने Selfless Parenting या आपल्या मराठी पॉडकास्टच्या वर्षपूर्ती नंतरची पहिली पोस्ट एका खूप महत्वाच्या व्यक्तीकडून मिळालेला प्रतिसाद आणि मार्गदर्शन आहे. Rajarambapu Institute of Technology  या अतिशय नावाजलेल्या शिक्षणसंस्थेबरोबर गेली अनेक वर्ष एक उत्तम प्रोफेसर ते प्रिन्सिपॉल ते डायरेक्टर असा प्रवास केलेली माझी मामी जी अतिशय उत्तम पालक सुध्दा आहे ती म्हणजे Dr. Sushma Kulkarni आज तुमच्यासमोर ती तिचे पालकत्वाविषयीचे विचार मांडतीये...खरं तर एक व्यक्ती म्हणून तिच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे आणि माझ्या या उपक्रमाच्या संकल्पनेपासून ते आजवरच्या प्रवासात वेळोवेळी तिने मला खूप प्रोत्साहन दिलंय. असंख्य पालक आणि मुलं जिच्या संपर्कात रोज येत असतात आणि एक शिक्षक आणि संचालक म्हणून तिला सध्याच्या काळातल्या पालकत्वाविषयी काय वाटतं आणि अर्थात माझ्या कामाविषयीसुद्धा ते जाणून घेऊया तिच्याच कडून... 

  • Encouraging Endorsements series - 13 Kiran Yadnyopavit
    2 min 36 sec

    Endorsements

  • पालकपणाची जाणीव विस्तारणारं… पालकनीती !!! - with Dr. Sanjeevani Kulkarni [Founder- Palakneeti] Ep.-31
    39 min 15 sec

    एकाच विषयावर वेगवेगळ्या माध्यमातून पण समांतर काम करत असलेल्या.. so called like minded असणाऱ्या व्यक्ती जेव्हा भेटतात तेव्हा ज्या गप्पा खुलतात आणि रंगतात त्या खूपच वेगळ्या आणि समृध्द करणाऱ्या असतात. ज्या हेतूने मी काम सुरु केलं तशाच किंबहूना त्याहीपेक्षा व्यापक हेतूने जवळपास ३५ वर्षांपूर्वी काम सुरु केलेल्या संजूताई अर्थात डॉ. संजीवनी कुलकर्णीना प्रत्यक्ष भेटल्यावर जे गवसलं ते कदाचित शब्दांत मांडता येणं कठीण आहे. १९८७मध्ये त्यांनी पालकनीती हे पालकत्वाला वाहिलेले मासिक सुरू केलं आणि १९९६ मध्ये पालकनीती परिवार ही विश्वस्त संस्था स्थापन झाली.पालकत्व  या विषयावर संजूताई आणि पालकनीती परिवाराने जे काम करून ठेवलंय आणि अजूनही चालू आहे त्याला खरोखरीच सलाम आहे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की, आज मी त्यांच्याशी जोडली गेले आणि तेही माझ्या कामामुळे. त्यांनी केलेलं कौतुक माझ्यासाठी त्यांच्या नावाप्रमाणेच संजीवनी देणारं आहे आणि त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास मला माझ्या पॉडकास्टच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोचवण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे सादर आहे , पालकनीतीचा अभूतपूर्व प्रवास उलगडणारा नव्या सिझनचा नवाकोरा एपिसोड संजू ताईंबरोबरच  

  • Gratitude Episode
    12 min 38 sec

    Trailer एपिसोड ला भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार तुमचं प्रेम , सदिच्छा अशाच पाठीशी असुद्या . आज तुमच्या समोर एक नवीन संकल्पना घेऊन येतेय ...जेव्हा पॉडकास्टींग हे नवं क्षेत्र explore करायचं ठरवलं तेव्हा खूप विचारांती पालकत्व हा विषय निवडला. पहिल्या एपिसोड चा जेव्हा विचार सुरु झाला, तेव्हा अचानक एक कल्पना सुचली की पालकत्वाविषयी तज्ज्ञांची मतं आपण नेहमीच ऐकतो पण आपलं पालकत्व ज्यांनी लीलया पेललं त्या आपल्या आई बाबांनाच आपल्या या नवीन प्रवासाचा श्रीगणेशा करायला बोलावलं तर ... येस्स ठरवलंच मग निमित्त ही तितकंच खास होतं .. त्यांच्या लग्नाचा ४० वा वाढदिवस  मग ऐकताय ना ,मी माझ्या आई बाबंचीच घेतलेली त्यांच्या parenting च्या प्रवासाची मुलाखत ... माझा पहिला GRATITUDE एपिसोड

  • Selfless Parenting - Myths of Parenting with Dr. Shruti Panse- Ep. 1
    29 min 3 sec

    पेरेंटिंग च्या प्रवासात आपल्याला अनेक प्रश्न पडत असतात. आदर्श पालक होण्याच्या नादात आपण बरेचदा चुकीचा च मार्ग अवलंबतो असं कधी जाणवलंय का तुम्हाला मुळात परफेक्ट पेरेंट अशी संकल्पना खरंच असते का अस्तित्वात कळतं पण वळत नाही अशी अवस्था होते ना बरेचदा क्वालिटी टाइम म्हणजे नेमका काय पेरेंटिंग च्या कुठल्या ट्रेट्स मध्ये आपण येतो या आणि अशाच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी, आज माझ्या पॉडकास्ट मध्ये एका खूप अनुभवी आणि तितक्याच down to earth व्यक्तिमत्वाला तुम्हाला भेटण्यासाठी घेऊन आलेय . ज्यांचे पालकत्वाविषयीचे धडे गिरवत माझा पालकत्वाचा प्रवास सुकर झाला अशा डॉ. श्रुती पानसे मराठीतून एम ए आणि ब्रेन डेव्हलपमेंट या विषयावर पीएचडी केलेल्या श्रुतीताईंनी अनेक वृत्तपत्रांमध्ये या विषयांवर लेख लिहिले आहेत. जवळ जवळ १९ पुस्तकांचं लेखन हि त्यांनी केलंय आणि चिकूपिकू या मुलांमध्ये खूप लोकप्रिय झालेल्या मासिकाच्या त्या संपादक आहेत. या विषयांवर त्यांनी अनेक कार्यशाळाही घेतल्या आहेत. तर ऐकताय ना ,मग या बहुरंगी व्यक्तिमत्वाची मी घेतलेली मुलाखत हा अजाण ते सुजाण पालकत्वाचा प्रवास श्रुती ताईंसारख्या अनुभवी व्यक्तींमुळे खूप सुखावह होईल यात शंकाच नाही  पुन्हा भेटूया, लवकरच एका नवीन एपिसोड मध्ये , तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा

  • आईपण पेलताना...from the Heart of the Host !!! Ep.2
    8 min 12 sec

    Selfless Parenting या आपल्या मराठी पॉडकास्ट मध्ये मी तुमची होस्ट शिल्पा, आज तुमच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन आलेय. काय काहीतरी माझ्या मनातलं , माझ्या स्वतःच्या अनुभवातून आलेलं ... माझ्या च शब्दांत आणि माझ्याच आवाजात नव्याने झालेल्या , होऊ घातलेल्या किंवा होण्याचा विचार करणाऱ्या माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी खास... आई होण्यापूर्वी आपल्याला दाखवलं जाणारं चित्र आणि नंतर प्रत्यक्ष अनुभवताना दिसणारं चित्र यातला फरक नीट कळावा आणि ते समर्थपणे पेलता यावं म्हणून हा प्रयत्न...माझे अनुभवाचे बोल माझ्या या पॉडकास्ट वर माझं स्वतः च असं काहीतरी sharing असावं असं आधीपासूनच मनात होतं ..तेच मूर्त स्वरूपात आणायचा प्रयत्न याद्वारे करतीये .. from the heart of the host ... आईपण पेलताना बघा कसा वाटतोय कळवायला विसरू नका.. प्रतिक्रियांची वाट बघतीये HAPPY PARENTING   शिल्पा. 

  • EP.4 - " पुस्तक परिचय " !!
    10 min 13 sec

    तुमच्या मुलांना भीती वाटते का तुमची मुलं हट्टीपणा करतात का तुमच्या मुलांना राग येतो का तुम्हाला तुमच्या मुलांशी नेमका कसा संवाद साधायचा असा प्रश्न पडतो का त्यांच्या शालेय जीवनाबद्दल काळजी वाटते का या सगळ्यांची उत्तरं जर हो अशी असतील तर हे सदर तुमच्याच साठी आहे पालकत्वा विषयी चौफेर माहिती तुम्हा सगळ्यांसाठी एकाच ठिकाणी उपलब्ध असावी या प्रामाणिक हेतूने आज पुन्हा एक नवा प्रयोग करायचा असं ठरवलं . आपण बरेचदा या विषयावरची खूप पुस्तकं बघत असतो , कधी वाचली जातात तर कधी वाचायची ठरवून विसरली जातात.. कधीकधी त्यात नेमकं काय आहे आणि ते आपल्याला खरंच उपयोगी पडणारे का हे नीट माहिती नसतं . अनेकदा तर बरीच चांगली पुस्तकं माहितीही नसतात. इच्छा तर असते पण वेळ नसतो .... एक ना अनेक . याच साठी हा एक मदतीचा हात देण्याचा छोटासा प्रयत्न . एक नवीन सदर जे अधून मधून तुमच्या भेटीला येत राहणार आहे , पुस्तक परिचय अर्थातच आपल्या विषयाशी निगडीत असलेल्या मग त्यात आपल्याला काय भावलं , content काय आहे त्यातल्या काही भागाचं वाचन , त्यामधून आपल्याला काय मिळालं त्या पुस्तकाशी निगडित एखादी आठवण , त्याचे लेखक, प्रकाशक यांचे तपशील अशा गोष्टींचा समावेश असेल.या सदराची सुरुवात मी मला खूप आवडलेल्या आणि माझ्या आवडत्या लेखिकेच्या एका पुस्तकाने करणारे कोणतं पुस्तकाचं नाव आहे, अशी का वागतात मुलं उन्मेष प्रकाशन यांनी प्रकाशित केलेलं , डॉ. श्रुती पानसे यांचं हे पुस्तक आहे . शंभर च पानांचं पण शंभर नंबरी पुस्तक आहे हे याच पुस्तकाचे अंतरंग उलगडून दाखवले आहेत आजच्या आपल्या पुस्तक परिचय या नवीन सदराच्या आजच्या भागात , नक्की ऐका आणि आवर्जून हे पुस्तक वाचा  

  • Happy Parenting starts with a Happy Marriage !!! Ep. 7 with Leena Paranjpe
    52 min 8 sec

    Selfless Parenting is happy to present this new theme based episode that gives a different perspective to Conscious PARENTING Do LISTEN. आपल्या Selfless Parenting या मराठी पॉडकास्ट वर मी शिल्पा आज एका खूप वेगळ्या अँगल ने पालकत्वाकडे बघण्याचा प्रयत्न करण्यासाठी एक वेगळी theme घेऊन तुमच्यासमोर आलीये Happy parenting starts with a happy marriage ...असा कधी विचार करतो का आपण की माझ्या पेरेंटिंग वर या गोष्टीचा किती परिणाम होत असेल काय संबंध आहे लग्न आणि पालकत्व यांचा परस्परांशी आणि असेल तर तो कसा खरं सांगायचं तर हा aspect प्रचंड महत्वाचा आहे एक उत्तम आणि सुजाण पालक होण्यासाठी... कसं त्यासाठीच तर हा प्रपंच या अशा अनोख्या एपिसोड साठी खूप अनोख्या पद्धतीने या विषयावर काम करणाऱ्या एका व्यक्तीला, तुम्हाला भेटायला घेऊन आलीये Indias FIRST Millennial Marriage Coach and so the sensible parent .. लीना परांजपे Millennial marriage coach म्हणून गेली अनेक वर्ष त्या उत्तम काम करताहेत . detox your marriage या नावाचं पुस्तकही त्यांनी लिहिलंय शिवाय Cementing wedding with marriage या अफलातून संकल्पनेवर आधारित अनेक workshops आणि एक पॉडकास्ट सुद्धा त्या चालवतात आज आम्ही एकत्र आलोय ते happy marriage कडून happy parenting च्या प्रवासाकडे कसं जात येईल या खूप महत्वाच्या अनुषंगाने पालकत्वाकडे बघण्यासाठी. मी प्रचंड उत्सुक आहे ते जाणून घ्यायला आणि मला खात्री आहे तुम्हीही तितकेच असाल ऐकुया तर मग आजचा एपिसोड काय घेऊन आलाय आपल्यासाठी

  • Encouraging Endorsements series- 2. Dr.Shruti Panse
    2 min 50 sec

    Selfless Parenting या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्रमैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं याविषयी तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला shini3015gmail.com वर mail करा... निवडक feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दिली जाईल वाट बघतीये तुमच्या प्रतिसादाची , नक्की पाठवा. Appreciation always appreciated

  • Encouraging Endorsements series- 5. Leena Paranjpe [India's only Millennial Marriage Coach]
    1 min 29 sec

    Selfless Parenting या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्रमैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं याविषयी तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला shini3015gmail.com वर mail करा... निवडक  feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दिली जाईल वाट बघतीये तुमच्या प्रतिसादाची , नक्की पाठवा. Appreciation always appreciated

  • Encouraging Endorsements series-6 Sushma Padhye
    2 min

    Selfless Parenting या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्रमैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं याविषयी तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला shini3015gmail.com वर mail करा... निवडक  feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दिली जाईल वाट बघतीये तुमच्या प्रतिसादाची , नक्की पाठवा. Appreciation always appreciated

  • Techno "logical" Awareness !! -with Prasad Shirgaonkar [Technologist by profession & writer-poet-photographer by passion] - Ep.18
    34 min 56 sec

    सध्या टेकनॉलॉजि आणि मुलं हा कळीचा मुद्दा झालाय आणि पालकांना त्या बाबतीत सजगपणे विचार करणं खूप गरजेचं आहे सध्याच्या काळात ..टेक्नॉलॉजी च्या नावाने फक्त खडे फोडण्यापेक्षा तिच्याबरोबर समतोल साधत कसं जगायचं हे आता शिकलं पाहिजे कारण ती आता आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनत चालली आहे मुलं तर या बाबतीत ४ पावलं पुढे असणारच आहेत पण त्यांना त्यातले धोके माहिती असतील च असं नाही त्यांना त्यापासून सावध करण्यासाठी , त्यांची मदत करण्यासाठी आपल्यालाही techno literate असणं खूपच गरजेचं आहे आताच्या काळात. आणि म्हणूनच हा समतोल साधत technology चा चांगला उपयोग कसा करता येईल याबद्दल जाणून घेऊया आपल्या आजच्या एपिसोड मध्ये २०२२ ची सुरुवात एका अत्यंत versatile guest सोबत करण्याची संधी मिळाली आजवर अनेक वर्तमानपत्रांतून , नियतकालिकांमधून , सोशल मिडिया च्या माध्यमांतून आपल्याला वरचेवर भेटणारा, त्याच्या ओघवत्या आणि सहजसोप्या लिखाणातून अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन करणारा मोकळ्या मनाचा लेखक, दिलखुलास हसणारा, हसवणारा आणि नकळत डोळ्यांच्या कडा पाणवण्याची ताकद असणारा संवेदनशील कवी, एक उत्तम फोटोग्राफर आणि त्याचबरोबर अतिशय हुशार असा तंत्रज्ञ म्हणूनही नावाजलेला प्रसाद दादा अर्थात प्रसाद शिरगांवकर एखादी व्यक्ती creative आणि intellectual दोन्ही पातळ्यांवर तेवढीच बेस्ट असू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रसाद दादा .चला तर मग, techno logical awareness विषयी जाणूनन घेऊया प्रसाद दादाकडून

  • Encouraging Endorsements series - 7 Shubhangi Khasnis
    1 min 33 sec

    Selfless Parenting या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्रमैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं याविषयी तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला shini3015gmail.com वर mail करा... निवडक  feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दिली जाईल वाट बघतीये तुमच्या प्रतिसादाची , नक्की पाठवा. Appreciation always appreciated

  • Parent To Be Episode with Savaniee Ravindrra ( National Award winning Playback Singer ) Ep.3
    30 min 49 sec

    पालकत्वाचा प्रवास हा एखादं जोडपं आईबाबा होणार हे कळल्यावरच सुरु होतो आणि हाच विचार मनात ठेऊन would be parent चा interview घ्यायचा असं मनात होतं . त्यासाठी जेव्हा सावनी ला विचारलं तेव्हा तिने क्षणात होकार दिला मला वाटतं हिच positive parenting ची सुरुवात आहे .आज एका कलाकार आणि would be parent ला तुम्हा सगळ्यांच्या भेटीला घेऊन आलेय . नुकत्याच पार पडलेल्या ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट सोहळ्यात जिला सर्वोत्कृष्ट पार्श्व गायिका म्हणून सन्मानित करण्यात आलं आणि आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमातून तिच्या सुरेल आणि सुंदर स्वराविष्कारांतून आनंद देणारी, अतिशय गोड आवाजाची आणि तितक्याच गोड स्वभावाची आपली सगळ्यांची आवडती गायिका सावनी रवींद्र तिचा एक प्रतिथयश गायिका म्हणून सुरु असलेला यशस्वी प्रवास आपण पाहतोच आहोत पण आता ती वैयक्तिक आयुष्यात एका वेगळ्या प्रवासाचीही सुरुवात करतीये... आईपणाची आज एक वेगळी सावनी सापडणार आहे आपल्याला या मुलाखतीतून ... चला तर मग जाणून घेऊया तिच्या या प्रवासाविषयी तिच्याकडून आपल्या selfless parenting या मराठी पॉडकास्ट च्या आजच्या भागात

  • How to make your"SELF" Happy?!! Ep.- 10 [Small yet Special Milestone] with Shubhangi Khasnis.
    44 min 9 sec

    पालकत्वाविषयीच्या अनेक चुकीच्या धारणा वर्षानुवर्षं आपल्याकडे चालत आल्या आहेत आणि त्यात आपण आणि आपली मुलं भरडून निघाली आहेत ... पालक म्हणून वावरताना आपण किती वेळा ती जबाबदारी खरंच जबाबदारीने निभावतोजेव्हा मी एक मूल जन्माला घालायचं ठरवतो तेव्हा जास्तीत जास्त financial planning चा विचार केला जातो पण mental planning चं काय मेख अशी आहे की आपण बदल नेहमी समोरच्यांकडून expect करतो पण मला बदलायची गरज आहे , माझ्या विचारांवर विचार करण्याची गरज आहे , फोकस स्वतःकडे वळवण्याची गरज आहे हेच आपण सोयीस्करपणे विसरतो, नाही का आपल्याला कोणी आरसा दाखवलेला आपल्याला अजिबात चालत नाही करतो ना असंच आणि याहीपेक्षा बरंच काही मग आज ऐकाच हा interview एकदा बघाच स्वतःकडे अशा पद्धतीने ... आपण स्वतःबद्दल काय विचार करतो आपण स्वतःला आवडलेलो असणं का महत्वाचं असतं स्वतःला स्विकारलं नसेल तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो आपण मुखवटे चढवून वावरतो तेव्हा आपल्या स्व ची काय अवस्था होते या सगळ्या विषयी अगदी सखोल चर्चा आज मी करणारे ज्यांनी मला आरसा दाखवला आणि माझा फोकस बदलला अशा माझ्या गुरु शुभांगी खासनीस यांच्यासोबत आपल्या सेल्फलेस पेरेंटिंग च्या छोट्याशा का असेना पण १० व्या milestone एपिसोड च्या निमित्ताने सेल्फ या अतिशय महत्वाच्या parenting च्या aspect वर मार्गदर्शन करायला आपले गुरूच पाहुणे म्हणून लाभणं यापेक्षा चांगलं काय असू शकतं ज्यांनी माझी स्वप्रतिमा बदलली त्यांच्याप्रती gratitude व्यक्त करण्याचा आणि त्यांनी मला शिकवलेलं तुम्हा सगळ्यांपर्यंत त्यांच्याच मार्फत पोचवण्याचा माझा हा एक छोटासा प्रयत्न नक्की ऐका आणि कसा वाटला ते जरूर कळवा

  • स्विकारूया समलैंगिकतेला !!! with Sameer Samudra & Amit Gokhale- [LGBTQ Activists] - Ep.11
    51 min 29 sec

    Selfless Parenting या आपल्या मराठी पॉडकास्ट च्या नवीन season ची सुरुवात एका अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील विषयाने करतीये जो आपल्याकडे कधीच बोलला आणि हाताळला जात नाही ... आणि केवळ त्या विषयी असणाऱ्या गैरसमज , आकस आणि नकारात्मकता यामुळे आजवर अनेक मुलंमुली भरडली गेली आहेत जात आहेत. आपलं मूल वयात येणार हे प्रत्येकच पालकाला माहिती असतं पण त्याचं sexual orientation काय असणारे हे आपण ठरवू शकत नाही ते निसर्गाने च ठरवलेलं असतं आणि ते जसं असेल त्या प्रमाणे त्याला किंवा तिला जगण्याचा पूर्ण अधिकार आहे या गोष्टीचा acceptance प्रत्येकाला असणं गरजेचं आहे.. जो दुर्दैवाने आपल्या समाजातल्या काही घटकांच्या बाबतीत अजिबात नाहीये हो,समलैंगिकता जी खरं तर अतिशय normal आहे. ह्या विषयी कमालीची उदासीनता आणि तिरस्कार आहे आपल्याकडे . असं मूल अगदी कोणाच्याही घरात जन्माला येऊ शकतं म्हणूनच त्याविषयी मुला पालकांना योग्य अशी माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि त्याच उद्देशाने मी घेऊन येतेय एका खूप humble आणि sensible gay couple ला ज्यांच्या अनुभवांचे बोल आपल्या सगळ्यांसाठी real eye opener ठरतील समीर समुद्र आणि अमित गोखले LGBTQ community साठी activists म्हणून काम करणाऱ्या , अशा मुला पालकांच्या मदतीसाठी कायम तत्पर असणाऱ्या, एक माणूस म्हणूनही ज्यांचा खरोखरी अभिमान वाटवा अशा या २ व्यक्तिमत्त्वांच्या प्रवासाविषयी आपण जाणून घेणार आहोत. एक सजग पालक होण्याच्या दृष्टीने या बाबत जाणून घेणं, तो awareness असणं आणि त्याविषयी खरी माहिती बाळगणं ही आपली जबाबदारी आहे असं मला वाटतं. नक्की ऐकाल , समजून घ्याल आणि जास्तीतजास्त share कराल हा आपला एपिसोड अशी आशा आहे स्विकारुया समलैंगिकतेला 

  • Embracing Fatherhood with Sukirt Gumaste [Publishing Manager-Storytel] Ep. 12
    42 min 49 sec

    मूल जन्माला येणार, असं कळता क्षणी बरेचदा सगळा फोकस आईकडे जातो तिला खूप जपलं जातं, विचारपूस केली जाते, हवं नको बघितलं जातं जे अर्थातच योग्य च आहे पण या सगळ्यात होणाऱ्या, होऊ घातलेल्या किंवा नुकत्याच झालेल्या बाबा चं काय त्याला काय वाटतं तो काय विचार करतो त्याची भूमिका काय त्याला काय challenges जाणवतात या पूर्ण प्रवासाचा तो मूक साक्षीदार च बनतो अनेकदा, हो ना खरं तर त्याचीही बाजू खूप महत्त्वाची असते पण ती सांगितली, ऐकली नाही जात सहसा... बाबाचा हळवा कोपरा बरेचदा दृष्टीआड च राहतो.. आणि त्याची कहाणी मनातच राहते.. तीच उलगडणार आहोत आणि तो कोपरा जाणून घेणार आहोत एका multi talented आणि नुकत्याच झालेल्या बाबा कडून सुकिर्त गुमास्ते Storytel हे नाव आपल्या सगळ्यांनाच सुपरिचित आहे तिथेच पब्लिशिंग मॅनेजर म्हणून गेली ५ वर्ष तो काम बघतोय. स्टोरीटेल च्या मराठी ओरिजिनल्स या सेगमेंट च्या under त्याने आजवर जवळजवळ २५ ऑडिओ नॉव्हेल्स, ५ पॉडकास्ट shows आणि ४० शॉर्ट stories produce केल्या आहेत मराठी youtube चॅनेल चा तो co founder आहे ज्यात तो ट्रॅव्हल ब्लॉगिंग करतो mass communication आणि journalism मध्ये पोस्ट graduation केल्यावर त्याने अनेक नामवंत वृत्तपत्रांसाठी ८ वर्ष पत्रकारिता देखील केलीये त्याचबरोबर मराठी समांतर रंगभूमीशी सुद्धा तो गेली १५ वर्ष जोडलेला आहे तर अशा या enthusiastic , energetic, empathetic आणि entry level बाबा शी आज गप्पा मारणार आहोत त्याच्या या नव्याने निभावत असलेल्या रोल बाबत Embracing Fatherhood या आपल्या आजच्या एपिसोड मध्ये

  • "Wrap-up 2021"- Glimpse of an amazing journey so far !!! Ep.17
    25 min 53 sec

    सादर आहे Selfless Parenting या माझ्या मराठी पॉडकास्ट मध्ये आजवर झालेल्या सगळ्या एपिसोड्स ची एक झलक नक्की ऐका, गेल्या काही महिन्यातल्या आपल्या या प्रवासात काय काय घडलं त्याविषयी... असं म्हणतात, when the why is clear, the how is easy मला एखादी गोष्ट का करायची आहे हे पक्कं माहिती असेल तर ती कशी करायची याचे अनेक पर्याय सुचत जातात फक्त एकच गोष्ट लागते सुरुवातीला इच्छाशक्ति ती जर असेल तर अवघड काहीच नाही . आणि याच गोष्टीची अनुभूती मी घेतली माझ्या या नवनिर्मिती मधून देवाच्या कृपेने, आई बाबांच्या आशीर्वादाने, नवऱ्याच्या पाठिंब्याने, लहान असूनही आईचं रेकॉर्डिंग आहे,आवाज नाही करायचा हे शहाण्यासारखं समजून वागणाऱ्या मुलींमुळे आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या प्रत्येक निर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणीआप्तेष्ट, मला साथ देणारे माझ्यावर विश्वास ठेवून प्रत्येक एपिसोड उत्तम करणारे माझे सगळे गेस्ट्स आणि सगळ्यात महत्वाचं मला माझ्या या निर्मितीमुळे ओळखणाऱ्या माझ्या श्रोत्यांमुळे आज हा प्रवास खूपच समृद्धपणे चालू आहे तुम्ही आजवर भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार तुमचं प्रेम , सदिच्छा अशाच पाठीशी असुद्या. येणाऱ्या नवीन वर्षात पालकत्वाच्या असंख्य कंगोऱ्यांवर आधारित अनेक नवनवीन एपिसोड घेऊन येईनच तर पुन्हा भेटू याच प्रवासात लवकरच selfless parenting या मराठी पॉडकास्टवर नवीन वर्षात हा प्रवास अधिक समृद्ध व्हावा हीच कामना Happy Parenting Happy New Year. 

  • होऊ 'मैत्र' पुस्तकांचे !!! with Manasee Mahajan [Story Teller & Founder - Jidnyasa Kids] -Ep.21
    40 min 9 sec

    Selfless Parenting या आपल्या मराठी पॉडकास्ट च्या नवीन सिझन ची सुरुवात नाविन्यपूर्ण एपिसोड ने करावी असं ठरवलं होतं गोष्टी ऐकून , वाचून आणि त्यातली चित्र बघून मुलं खूप काही शिकतात पण ते करण्यासाठी त्यांना कसं प्रवृत्त करता येईल यावर एक एपिसोड करून पालकांना कशी मदत करता येईल याचा शोध घेता घेता एका अफलातून मुलीशी ओळख आणि मग मस्त मैत्री झाली मानसी महाजन जिज्ञासा किड्स या संस्थेची founder आणि सगळ्यात छान ओळख म्हणजे गोष्ट सांगणारी ताई तिच्या जिज्ञासा किड्स या संस्थेमधून मुलांची पुस्तकांशी मैत्री करून देण्याचे काम ती करते. मुलांसाठी ती रीडिंग क्लब चालवते, आणि ज्या मुलांना पुस्तके मिळू शकत नाहीत, अशा मुलांसाठी मानसी पुस्तक खिडकी नावाचे इमॅगझीन चालवते. लॉकडाऊन मध्ये मुलांना उत्तम गोष्टी ऐकता याव्यात यासाठी तिने कथा कविता खजाना नावाचा Youtube चॅनेल सुरु केला आहे. पपेट शो च्या मध्यमातून गोष्टी सांगणे आणि वेगवेगळे कल्पक पपेट तयार करण्याची ती कार्यशाळा सुध्दा ती घेते.खरंतर आणखी ही बरंच काही आहे तिच्याबद्दल सांगण्यासारखं पण मला वाटतं आपण ते तिच्याकडूनच ऐकूया आपल्या आजच्या भागात

  • Feedback from a very genuine listener & follower of Selfless Parenting - Shailesh Mhapankar !!!
    2 min 18 sec

    आज चा feedbackfriday खूप स्पेशल आहे असं म्हणायला हरकत नाही कारण तो आजवर मला कधीही प्रत्यक्ष न भेटलेल्या किंवा वैयक्तिकरित्या न ओळखणाऱ्या पण Selfless Parenting च्या genuine follower कडून आलाय खरंतर मी पॉडकास्ट सुरु केल्यापासून अनेक चांगल्या चांगल्या लोकांशी जोडले गेले आणि अनुभवांनीही समृध्द होत गेले, हे तर आहेच पण आपण करत असलेल्या कामाला एखादी व्यक्ती अगदी सुरुवातीपासून follow करते वेळोवळी त्या त्या एपिसोड विषयी प्रतिक्रिया ही देत असते आणि मग मिळतो इतका मनापासून आणि विचारपूर्वक दिलेला अभिप्राय ही एका होस्ट साठी किती समाधान आणि प्रोत्साहन देणारी बाब आहे, हे कदाचित शब्दांत वर्णन करणं नाही शक्य ... काही गोष्टी या फक्त feel च करण्यासारख्या असतात आणि पुढच्या कामासाठी उभारी देणाऱ्याही त्यातलाच हा आजचा अप्रतिम अभिप्राय शैलेश म्हापणकर यांनी दिलेला त्यांच्या आजवर मिळालेल्या प्रत्येक उत्स्फुर्त प्रतिक्रियांमधून मला नेहमी genuine gesture च जाणवलंय आणि जे माझ्यासाठी खूपच महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद शैलेशजी... this means really a lot शैलेश आणि मी आजवर virtually च भेटलोय आणि ओळखही social media च्या माध्यमातूनच झाली. आपल्या एखादया गोष्टीसाठी किंवा कामाविषयी इतकं आतून आणि भरभरून कौतुक असणारे ,वाटणारे आणि व्यक्त करणारे त्यातही प्रशंसा करताना हातचं राखून न वागणारे लोक खूपच दुर्मिळ झालेले असताना शैलेश मात्र त्याला अपवाद ठरले नक्की ऐका , an inner voice of this parent who believes that parenting is a practicing art Thanks Shailesh for this new perspective towards parenting as well lovemylisteners  Selfless Parenting या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्रमैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं याविषयी तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला shini3015gmail.com वर mail करा... निवडक  feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दिली जाईल वाट बघतीये तुमच्या प्रतिसादाची , नक्की पाठवा. Appreciation always appreciated  

  • Encouraging Endorsements series - 9 Sukirt Gumaste
    1 min 33 sec

    Thanks for this encouragement Sukirt Gumaste Selfless Parenting या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आमंत्रित पाहुण्यांना, मित्रमैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. तुम्ही देखील तुम्हाला माझा हा प्रयत्न कसा वाटतो याविषयी तुमच्या ध्वनिमुद्रित/लिखित प्रतिक्रिया पाठवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ किंवा लिखित प्रतिसाद  shini3015gmail.com वर पाठवा... निवडक feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दिली जाईल वाट बघतीये .. Appreciation always appreciated  

  • 'Selfless' Parenting turned 1 🥳 - FIRST Milestone Achieved !!!
    6 min

    कुठल्याही बाबतीत पहिल्या गोष्टीला आपल्याकडे खूप महत्वाचं मानलं जातं तीच गोष्ट माझ्या पॉडकास्टच्याही बाबतीत घडतीये.. मला, पालकत्व या विषयावर आधारीत असणारा माझा सेल्फलेस पेरेंटिंग हा मराठीतून असणारा पॉडकास्ट सुरु केल्याला १ वर्ष पूर्ण झालं आणि त्यातही २५ भाग म्हणजे एपिसोडस ची silver jubilee सुध्दा झाली खरं तर या मध्ये मला साथ , पाठींबा आणि प्रोत्साहन दिलेल्या सगळ्यांचीच खूप महत्वाची भूमिका आहे आणि असणार आहे पण या सुंदर दिवसाची आठवण कायम राहावी म्हणून हा एक छोटासा प्रयत्न... माझा हा आजवरचा प्रवास, त्यातले काही milestones आणि माझ्या मित्रांनी या निमित्ताने मला दिलेल्या प्रतिक्रिया आणि शुभेच्छांची छोटीशी झलक खास तुमच्यासाठी लोभ कायम असुद्या इथून पुढच्या वाटचालीसाठी शिल्पा इनामदार यज्ञोपवित. Thanks a lot Nachiket Kshire Dhiraj Deshpande Mangesh Wagh Sameer Athalye for your wonderful words.. means really a lot  

  • Encouraging Endorsements series - 11- Aditya Oak
    1 min 30 sec

    Thanks for this appreciation Aditya Selfless Parenting या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आमंत्रित पाहुण्यांना, मित्रमैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. तुम्ही देखील तुम्हाला माझा हा प्रयत्न कसा वाटतो याविषयी तुमच्या ध्वनिमुद्रित/लिखित प्रतिक्रिया पाठवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ किंवा लिखित प्रतिसाद shini3015gmail.com वर पाठवा... निवडक feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दिली जाईल  

  • Home Schooling : Bringing Education Home !!! with Neelima Deshpande. Ep. 28
    49 min 46 sec

    येत्या रविवारी असणाऱ्या NationalParentsDay च्या निमित्ताने पालकांमध्ये खूप उत्कंठा आणि उत्सुकता असणाऱ्या आणि बरेचदा ज्याची खूप धास्तीदेखील मनात असते अशा होमस्कूलिंग या संकल्पनेवर आधारीत असणाऱ्या आजच्या या भागात आपल्याबरोबर असणारे स्वतःच्या मुलीचं पहिली ते दहावी होमस्कूलिंग केलेली एक हरहुन्नरी पालक, निलीमा देशपांडे मुळात होमस्कूलिंग म्हणजे नेमकं काय या अगदी बेसिक प्रश्नापासून ते तो स्विकारायची तयारी कशी करायची त्यासाठी कुठल्या महत्वाच्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे कोणाची मदत घेता येते का त्याच्या पद्धती कोणत्या या पद्धतीचे फायदे आणि तोटे काय असतात अशा बऱ्याच गोष्टी नीलिमाकडून आज आपण जाणून घेणार आहोत आणि हो , cherry on the top म्हणजे हा संपूर्ण प्रयोग जिच्यावर झाला तिचं या प्रवासाविषयी काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी तिच्या मुलीशी, जान्हवीशीसुद्धा आपण बोलणार आहोत अर्थात या प्रवासात तिचे बाबा ऋतुराज यांचाही खूप सक्रिय सहभाग आहेच, पण कामाच्या व्यवधानातून त्यांना वेळ काढणं जमलं नाही पण त्यांना आपण एका वेगळ्या प्रकारे भेटू शकतो ..कसं ते episode पूर्ण ऐकल्यावर कळेलच चला तर मग ऐकूया HOMESCHOOLING या पध्दतीने प्रदीर्घ काळ शिकवलेल्या आणि शिकलेल्या एका हरहुन्नरी पालक आणि मुलीच्या अनुभवाचे बोल सांगणारा Selfless Parenting चा नवाकोरा एपिसोड

  • Encouraging Endorsements series - 12 Prasad Shirgaonkar
    1 min 39 sec

    Endorsements series

  • पुस्तक परिचय "बालनीती " - डॉ. कल्पना सांगळे [Book review with Dr.Kalpana Sangle] Ep.30
    19 min 22 sec

    book review

  • गोष्ट "शाळेतल्या" पालकाची !!! [Parenting journey of a passionate TEACHER] - with Balaji Jadhav
    44 min 15 sec

    An inspiring story of social parenting journey of an innovative teacher Mr. Balaji Jadhav

  • Prakriya - Exploring the Natural learning process !!! with Mugdha Nalawade
    39 min 46 sec

    An insightful episode about natural learning process of children

  • मराठी भाषा गौरव दिन विशेष भाग - प्रसाद गोखले [संस्थापक- 'मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत' फेसबुक समूह] Marathi Bhasha Gaurav Din- Special episode !!!
    45 min 53 sec

    मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने, मातृभाषेतून अर्थात आपल्या मराठी भाषेतून शिक्षण या विषयावर आधारीत एक खास भाग खरंतर मराठी भाषेला ज्ञानभाषा म्हटलं जातं म्हणजे त्या भाषेतून तुम्ही सगळ्या विषयांचा अभ्यास करू शकता ...मग असं असताना, पालकांचा कल मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकवण्याकडे किंवा त्याच माध्यमाच्या शाळांमध्ये घालण्याकडे का असतो मुलांना शाळेत घालताना खरंच पालक काय विचार करतात .. खरंच इंग्रजी माध्यमातून शिकणं ही काळाची गरज आहे का मुलांना मातृभाषेतून शिकवणं का योग्य असतं त्यामागचा शास्त्रीय आधार काय आहे या सगळ्यावर सखोल चर्चा करूया... हे सगळं समजून घेऊया, त्यावर सकारात्मक विचार करूया आणि मराठी भाषेला खऱ्या अर्थाने जगवूया On the occasion of Marathi Bhasha Gaurav Din, a special episode based on the topic of education through mother tongue i.e. our Marathi language Actually Marathi language is called Gyanbhasha which means you can study all subjects through that language...so why do parents tend to teach their children through English medium or send them to English medium schools What do parents really think while sending their children to school.. Is learning through english medium really the need of the hour Why is it right to teach children through mother tongue What is the scientific base behind it Lets discuss all this in depth... Lets understand all this, lets think positively about it and lets live Marathi language in real sense या भागाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो मी एका पालकांबरोबर केला आहे प्रसाद गोखले जे स्वतःच्या मुलाला तर मराठी माध्यमातून शिकवतातच पण मराठी माध्यमातून शिक्षण या विषयावर बरंच काम देखील करतात मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत या १ लाखांच्या वर फॉलोवर्स असणाऱ्या फेसबुक समूहाचे ते संस्थापक आहेत या माध्यमातून online  आणि offline  दोन्ही पद्धतीने ते खूप सक्रिय आहेत .. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतं, पण असं म्हणत जर आपण मुलांना मराठी म्हणजेच त्यांच्या मातृभाषेतून शिकवणार नसू तर त्या म्हणण्याला काहीच अर्थ उरणार नाही  पटतंय ना तुमच्या आमच्या सारख्या पालकांचं प्रतिनिधित्व करणारे हे पालक काय म्हणताहेत एकदा ऐकून तर घ्या ... एपिसोड नक्की ऐका ... Do you like my exclusive marathi podcast Selfless Parenting Want to collaborate Would like to connect for work...Then kindly write to me on shini3015gmail.com  Please share your valuable audio or written feedbacks on the same ..Looking forward to it Also follow my official pages on FB, Instagram Youtube  Links,selflessparentingbyshilpa on Instagramhttps://www.facebook.com/podcastbyshilpa/ on FBtinyurl.com/4a89n5k7 on YouTubePlease do Listen, Follow, Share Subscribe to my podcast and dont forget to give 5 star ratings write reviews on your favorite platforms

  • Encouraging Endorsement Series - Dr. Kalpana Sangale
    2 min 6 sec

    Feedback on my podcast from my guests, well wishers and listeners

  • 'Talk' it easy !!! with Ashwini Godse [Early Childhood Expert]
    50 min 6 sec

    अनेकदा असं बघितलं जातं की फक्त प्रसंग घडायचा अवकाश, पालक ठराविक वाक्यांची सरबत्ती चालू करतात...त्या वाक्यांच्या परिणामांचा विचार न करता आपण सर्रास फेकत असतो अशी वाक्य आणि आपल्याला त्याचं गांभीर्य लक्षात येतं तोवर बरेचदा उशीर झालेला असतो.. मुलं दुरावल्यावर पश्चाताप करुन काहीच उपयोग नसतो.. याच विधानांच्या मागची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी एक वेगळा प्रयोग करायचं ठरवलं It is often seen that  parents use certain statements frequently... without thinking about the consequences of those sentences, we throw such sentences and by the time we realize the seriousness of it, it is often too late. So.. I decided to do a different experiment to know the reasoning behind these statements नुसतं प्रश्नउत्तर असं एकाच पठडीत न करता वेगळा प्रयत्न करायचं ठरवलं आणि तेव्हा क्षणात एकच नाव मनात आलं आणि ते म्हणजे अश्विनी ताई ..गेली २० वर्ष मुलांबरोबर आणि मुलांसाठी काम करणारी बालशिक्षण तज्ञ अश्विनी गोडसे  या क्षेत्रातली अभ्यासक आणि तज्ञ म्हणून अशा काही विधानांची तिने उकल करून सांगितली तर ते पालकांना जास्ती relatable होईल या विचाराने हा प्रयत्न करायचं ठरवलं.. तर घराघरांत अशी सर्रास ऐकू येणारी विधानं आणि त्याची अश्विनी ताईच्या अत्यंत मनमोकळ्या आणि खुमासदार शैलीत उकल असा अनोखा भाग आज घेऊन आलेय Do fill the survey if you are really keen to get more insights, https://tinyurl.com/3k4uabh3

  • Encouraging Endorsements Series- Mrunmayee Agnihotri
    1 min 51 sec

    Feedback on my podcast

  • Are you 'Cyber Literate??' - with Mukta Chaitanya [ Freelance Journalist & Social Media Expert]
    56 min 40 sec

    About how to get cyber literate awareness precaution

  • Trailer Episode
    3 min 47 sec

    पालकत्व हे रोज नव्याने उलगडणारं , उमजणारं ,समजणारं खूप वेगवेगळे अनुभव देणारं , तर कधी कधी त्रस्त करणारं , काळजी वाढवणारं , खूप दमवणारं आणि कसोटी पाहणारं सुद्धा असतं नाही का सध्याचा काळ तर या बाबतीत अगदी तसाच आहे.म्हणूनच स्वानुभवातून आणि बरेच दिवसांपासून या विषयावर काम करण्याच्या तळमळीतून आपला हा podcast जन्माला आलाय इथे तुम्हाला पालकत्वाविषयी अनेक तज्ञ व्यक्तींचे पालकत्वाच्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांवरचे interviews, tips , parenting वरील उपयुक्त पुस्तकांची माहिती , वेगळ्या आणि अनोख्या पद्धतीने मुलांना वाढवलेल्या काही पालकांचे अनुभव , मुलांबरोबर आणि मुलांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींविषयी माहिती आणि आणखीनही बरंच काही असणारे in short , one stop solution for all your parenting concerns and needs चला तर मग, सुरु करूया, प्रवास अजाण ते सुजाण पालकत्वाचा नक्की ऐका आणि follow करा माझ्या selfless parenting या मराठी पॉडकास्टला :  

  • Psyche of Parenting - Anuja Kulkarni Ep.5
    59 min 7 sec

    आताच्या काळात बरेच पालक कौन्सेलिंग विषयी बऱ्यापैकी सजग होऊ लागले आहेत किंवा cautious झाले आहेत. पण नेमकं करायचं काय वागायचं कसं चुकतंय कळतंय पण सुधारायचं कसं असे बरेच साशंक असलेले पालक आजुबाजूला पाहायला मिळतात . बरेचदा मानसोपचार तज्ज्ञाकडे जाण्याची वेळ आलीये हेच लक्षात येत नाही ... चुकांवर चुका होत राहतात कळतं पण वळत नाही, असं होतं आणि मग पश्चातापाची वेळ येऊ शकते . होतं ना असंच काहीसं .. मी शिल्पा, आपल्या या मराठी पॉडकास्ट मध्ये आज या सगळ्यावरची उत्तरं मिळवण्यासाठी एका खूप छान , हसऱ्या आणि फ्रेंडली व्यक्तिमत्वाला घेऊन आलीये अनुजा कुलकर्णी जिज्ञासा असेसमेंट कौन्सेलिंग या संस्थेची ती co founder आहे . अनुजा जवळ जवळ गेली ८ वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहे. ती क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करते . तसंच अनेक शाळा आणि कॉरपोरेट क्षेत्रातही अनुजाने आजपर्यंत उत्तम काम केलंय . सध्या ती parenting styles behavioural issues of pre schoolers या विषयावर Phd देखील करतीये . आणखी खूप महत्वाचं म्हणजे जिज्ञासा चा एक युट्यूब चॅनेलही ती चालवते जो आपल्यासारख्या पालकांसाठी खूप महत्वाच्या विषयांवर माहितीपूर्ण ठरणारा आहे. चला तर मग जाणून घेऊया अनुजा कडून , what Psychology says about PARENTING  

  • Uncommon Upbringing - Abha Bhagwat Ep.6
    44 min

    Parents Day Special Episode on Uncommon Upbringing with Abha Bhagwat रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ... हे वाक्य अर्थार्थी जिच्याबद्दल खरं ठरलंय असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही अशी अत्यंत मितभाषी आणि तितकीच खंबीर असणारी रंगजा च्या माध्यमातून आपल्या पुण्यनगरीतल्या अनेक बेरंगी आणि जुन्या भिंतींवर रंगांचा साज चढवून त्यांचा कायापालट करण्याचा ध्यास घेतलेली आभा ताई अर्थात आभा भागवत आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे सुप्रसिद्ध भित्तिचित्रकार आणि रंगजा या संस्थेची संस्थापक तसंच शोभाताई आणि अनिल भागवतांची मुलगी म्हणून आभा भागवत हे नाव बहुश्रुत आहेच पण आज आपल्या Selfless Parenting च्या माध्यमातून , तिच्या एका वेगळ्या छटेची ओळख तुम्हा सगळ्यांना आपल्या पॉडकास्ट च्या आजच्या भागातून करून देणारे...तिच्या मधल्या सुजाण आणि संवेदनशील पालकाची ती करत असलेल्या तिच्या मुलांच्या uncommon upbringing ची आभा ताई एक पालक म्हणून का वेगळी आहे ते आज आपल्या या मुलाखतीतून उलगडणार आहे. हे नेमकं काय वेगळेपण आहे ते जाणून घ्यायला उत्सुक आहात ना चला तर मग जाणून घेऊया तिच्याच कडून. सादर आहे, Parents Day च्या खास निमित्ताने एका खास पालकाची अर्थात आभाताईची पालकत्वावरची पहिलीवहिली मुलाखत  

  • चला "मुक्त" होऊया !!! Ep.8 - with Mukta Puntambekar
    53 min 9 sec

    ADDICTION हा सध्या सगळ्यांच्याच काळजीचा बनत चाललेला विषय झालाय मग ते drinks असोत, drugs असोत की screen ... अडकत चाललोय हे कळतं पण बाहेर कसं पडायचं हेच कळत नाहीये हो ना आणि दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर च बनतोय असंही वाटतं, म्हणूनच त्यातले धोके समजून घेणं , त्यावर उपाय काय त्यांना कसं tackle करता येईल, त्यातून बाहेर कसं पडावं आणि सर्वांत महत्वाचं मुलांना म्हणजेच पुढच्या पिढीला यापासून परावृत्त कसं करता येईल या अतिशय महत्वाच्या विषयांवर Selfless parenting च्या माध्यमातून मी तुमची होस्ट शिल्पा आज मुक्ताताईंबरोबर यावर चर्चा करणार आहे आणि मला खात्री आहे आपल्याला यातून नक्कीच चांगलं मार्गदर्शन मिळेल आपल्या समाजाप्रती असलेल्या देण्याची जाणीव जेव्हा खूप तीव्र असते , त्यातून जेव्हा स्वयंप्रेरणेने काम करण्याची उर्मी येते आणि त्यासाठी आपलं आयुष्य देण्याची तयारी असते तेव्हाच त्यातून असामान्य कामगिरी केली जाते पुण्यात अशा अनेक असामी तयार झाल्या आणि अजूनही आहेत याचा सार्थ अभिमान ज्यांच्यामुळे आपण बाळगू शकतो अशा व्यक्तींपैकी एक आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभली आहे , ती म्हणजे मुक्ता ताई अर्थात मुक्ता पुणतांबेकर मुक्ता ताईंनी स्वतः क्लिनिकल सायकॉलॉजि मध्ये डॉक्टरेट केलेलं आहे आणि गेली २७ वर्ष ती मुक्तांगण मध्ये एक कौन्सेलर ते संचालिका या पद्धतीने काम बघत आहे. community based rehabilitation prevention यावर आधारित अनेक प्रोग्रॅम्स आणि वर्कशॉप्स देखील ती घेते. त्याचबरोबर अनेक वृत्तपत्र आणि मासिकांमधून या विषयांवर लेखनही करत असते. मुक्तांगणच्या या उदात्त कार्याला खरंच सलाम चला व्यक्त होऊया आणि मुक्त होऊया  

  • शिकणं, शिक्षण आणि पद्धती- सुषमा पाध्ये Ep. 9
    45 min 3 sec

    शिकणं म्हणजे काय मूल कसं शिकतं शिक्षण घेणं किंवा देणं या प्रक्रिया कशा असतात आणि कशा असाव्यात शिक्षणाची योग्य पद्धत कशी असावी अभ्यासाच्या ताणाचं नियोजन कसं करावं National Education Policy NEP मध्ये नक्की काय अपेक्षित आहे शिक्षणाच्या वेगवेगळ्या पर्यायी व्यवस्था कोणत्या आणि त्या कशा पद्धतीने काम करतात अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्याविषयी शास्त्रशुद्ध माहिती देण्यासाठी घेऊन येतेय बालशिक्षण क्षेत्रात गेली अनेक वर्ष सखोल अभ्यास करून आशयविकसित करणाऱ्या , सहज आणि मेंदू आधारित शिक्षण या खूप महत्वाच्या विषयाची कास धरून सतत प्रयोगशील असणाऱ्या आणि त्यावर आधारित साहित्यसाधनांची ची निर्मिती करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ सुषमा ताई अर्थात सुषमा पाध्ये यांना शिक्षक दिनाचं औचित्य साधून शिकणं , शिक्षण आणि पद्धती या त्रिसूत्री वर आधारीत असा अतिशय महत्वाचा विषय हाताळणारा आजचा आपला भाग आहे आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेली व्यक्ती देखील एक हाडाची शिक्षिका च असणं हा दुग्धशर्करायोग आहे आवर्जून ऐका आणि शेयर करायला विसरू नका..

  • Encouraging Endorsements Series- 1. Savaniee Ravindrra
    2 min 24 sec

    Selfless Parenting या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्रमैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं याविषयी तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला shini3015gmail.com वर mail करा... निवडक feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दिली जाईल वाट बघतीये तुमच्या प्रतिसादाची , नक्की पाठवा. Appreciation always appreciated

  • Encouraging Endorsements series- 3.Anuja Kulkarni
    1 min 50 sec

    Selfless Parenting या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्रमैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं याविषयी तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला shini3015gmail.com वर mail करा... निवडक feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दिली जाईल वाट बघतीये तुमच्या प्रतिसादाची , नक्की पाठवा. Appreciation always appreciated

  • Encouraging Endorsements series- 4. Abha Bhagwat
    1 min 40 sec

    Selfless Parenting या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्रमैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं याविषयी तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला shini3015gmail.com वर mail करा... निवडक feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दिली जाईल वाट बघतीये तुमच्या प्रतिसादाची , नक्की पाठवा. Appreciation always appreciated

  • "पुस्तक परिचय" - by Prasad Manerikar [Founder, Anubhutee Knowledge & Research Foundation, Pune ] Ep.13
    13 min 53 sec

    बरेच दिवसांनी परत एकदा पुस्तक परिचय घेऊन येतेय पण या वेळेस तो करून देणारेत त्याच पुस्तकाचा लेखक म्हणून एक भाग असणारे तसंच गेली १५ वर्ष शिक्षण क्षेत्रात त्यातही प्रायोगिक शिक्षणात नवनवे प्रयोग करणारे आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे community based learning च्या आधारावर स्थापन केलेल्या अनुभूती नॉलेज अँड रिसर्च फाऊंडेशन या संस्थेचे संस्थापक प्रसाद मणेरीकर अर्थात प्रसाद दादा. बालकेंद्री शास्त्रशुद्ध शिक्षण पद्धतीच्या विकसनासाठी सुद्धा प्रसाद दादा कार्यरत आहेत. ग्राममंगल या प्रयोगशील शिक्षण संस्थेसोबत अनेक शैक्षणिक प्रयोग आणि पालकशिक्षक कार्यशाळा घेतलेल्या प्रसाद दादांनी लहान मुलांसाठी काही पुस्तकांचं लेखनही केलंय तर अशा बहूआयामी व्यक्तिमत्वाकडून पालकांसाठी अतिशय उपयुक्त अशा अधिक सुजाण पालकत्वासाठी पालकशाळा या मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाचं विवेचन आज आपण करणार आहोत , चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला , ऐकूया प्रसाद दादा काय सांगताहेत या पुस्तकाच्या अंतरंगाविषयी

  • "बा का रं का" - A special Toy-kit by Swaarka [स्वार्क] with Chaitrali Rahalkar - Ep.14
    24 min 6 sec

    कोरोनाच्या कठीण काळात ज्या काही अडचणींचा सामना आपण केला आणि करतो आहोत त्यामध्ये प्रामुख्याने screen addiction ही फारच गंभीर समस्या आहे आणि त्याचे दुष्परिणाम काय असतात हे आपण आधीही मुक्ता ताईकडून जाणून घेतलं होतं . समस्या आहे मुलांच्या दृष्टीने तर अगदी काळजीचीच बाब आहे हे तर कळतंय पण नेमकं कसं बाहेर काढायचं मुलांना यातून , काय पर्याय आहेत त्यातही मुलं लगेच बोअर होतात मग काय करायचं खेळण्यांवर इतका खर्च करायचा आणि ते एकदोनदा खेळून मुलं सोडून देतात आणि घरात फक्त अडगळ आणि पसाऱ्याला कहार होतो नाही का डोन्ट वरी मंडळी आपल्या या मराठी पॉडकास्ट मध्ये मी तुमची होस्ट शिल्पा, आज या सगळ्यांवर सोल्युशन काढलेल्या आणि मुलां पालकांसाठी वेगवेगळ्या उपक्रमांमधून काम करणाऱ्या, एका संस्थेच्या एकदम हटके आणि तितक्याच उपयुक्त अशा एका खास मुलांसाठी बनवलेल्या खूप छान toykit ज्याला ते बा का रं का असं म्हणतात त्या विषयी माहिती द्यायला माझ्या एका मैत्रिणीला घेऊन आलेय संस्थेचं नाव आहे स्वार्क आणि मैत्रीण जी या संस्थेची co founder आहे ती आहे चैत्राली रहाळकर चैत्राली आज सगळ्या पालकांचा मोठा प्रश्न सोडवायला आणि तिच्या संस्थेच्या या आगळ्यावेगळ्या नवीन उपक्रमाविषयी विषयी माहिती द्यायला खास आलीये तर जाणून घेऊया काय आहे या स्वार्क च्या पोटलीत

  • "सुजाण पालकाच्या लेखणीतून" with Dr. Amit Bidwe [Orthopaedic Surgeon & An Author] - Ep. 15
    10 min 39 sec

    तुम्ही कधी राग न आवरून मुलांना मारलंय का नंतर त्यांचे केविलवाणे चेहेरे आठवून आणि रडण्याचे आवाज कानात घुमून तुम्हाला प्रचंड guilt आलाय का एखाद्या गोष्टीसाठी मुलांना बोलून, त्यांच्यावर चिडून झाल्यावर नंतर त्यात त्यांची काहीच चूक नव्हती आपण उगाच बोललो असा पश्चाताप तुम्ही अनुभवलाय का मुलं आपलं ऐकत नाहीत अशी तुमची तक्रार असते का मुलं अचानक मोठी झालीयेत असा साक्षात्कार तुम्हालाही झालाय का मग हे नक्की ऐका ... सुजाण पालकाच्या लेखणीतून ... व्यवसायाने प्रथितयश ऑर्थोपेडिक डॉक्टर, ४ वेगवेगळ्या पुस्तकांचे लेखक, हौशी फोटोग्राफर आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतःचं पालकत्व अतिशय संवेदनशीलपणे जगणारे आणि त्यात येत गेलेले अनुभव खूप तरलपणे शब्दांत मांडणारे डॉ. अमित बिडवे जाणून घेऊया,त्यांच्या पालकत्वाच्या प्रवासातले हे अनुभव..त्यांच्याच शब्दांत आणि सादर करतीये माझ्या आवाजात...तुमची होस्ट, शिल्पा  डॉ अमितसारखेच तुमचेही काही अनुभव असतील , तुम्हालाही तुमचं स्वतःचं असं काही शेयर करावंसं वाटत असेल तर मला नक्की कळवा

  • "Write" Understanding !!! - with Aditya Oak [Graphologist & Handwriting Expert] Ep.-16
    37 min 39 sec

    असं म्हणतात, handwriting is an image of your personality खरं तर हे वाक्य जेव्हा वाचनात आलं तेव्हा त्याचा नीटसा context माहिती नव्हता पण जेव्हा ग्रॅफॉलॉजि या क्षेत्राविषयी कळालं तेव्हा त्यातला गर्भितार्थ लक्षात आला. एखाद्याच्या हस्ताक्षर, सही किंवा कागदावर व्यक्त होण्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल , व्यक्तिमत्वाविषयी, त्याच्या विचारसरणी विषयी बऱ्याच गोष्टी कळू शकतात , त्याचा अभ्यास करून त्यावर काम करता येऊ शकतं आणि आणखीनही खूप कंगोरे उलगडता येतात . किती वेगळं आणि विशेष आहे हे शास्त्र , नाही का त्याचा सगळ्यात जास्ती उपयोग कोणाला होऊ शकतो तर तो मुलांना आणि त्यायोगे पालकांना खास या विषयात करियर केलेल्या, त्यातल्या अनेक शाखांचा सखोल अभ्यास करून त्यामाध्यमातून या आगळ्यावेगळ्या क्षेत्राची लोकांना माहिती मिळावी या उद्देशाने स्वतःची एक संस्था सुरु करणाऱ्या एका dynamic आणि enthusiastic ग्रॅफोलॉजीस्ट आणि handwriting expert ला आज मी घेऊन आलेय Srujan graphological solutions coaching centre चा founder, आदित्य ओक आदित्य प्रोफेशनल ग्रॅफोलॉजीस्ट आणि questioned documents analyst म्हणून गेली अनेक वर्ष काम करतोय त्याने स्वतः तयार केलेल्या वेगवेगळ्या मॉड्युल्स च्या आधारे तो personality profiling consultation सुद्धा करतो ज्याचा उपयोग करियर गायडन्स , कॉर्पोरेट रिक्रुटमेंट , स्पोर्ट्स स्पेसिफिक अससेसमेंट अशा अनेक बाबतीत होऊ शकतो आहे ना खूपच इंटरेस्टिंग ...चला तर मग जाणून घेऊया या हटके पण खूप insightful आणि अर्थात मुलांना जाणून समजून घेण्याचा वेगळा दृष्टिकोन देणाऱ्या क्षेत्राविषयी आदित्याकडून. 

  • 'भूमिका : पडदयामागच्या पालकाची' - with Kiran Yadnyopavit [Writer, Director & Actor- Marathi & Hindi film and TV Industry] Ep. 19
    43 min 56 sec

    सिनेसृष्टी आपल्या सगळ्यांनाच लहानपणापासून आकर्षित करत आलीये .. त्या वलयामध्ये वावरणाऱ्या लोकांबद्दल अप्रूप , कौतुक , उत्सुकता , आकर्षण , समज गैरसमज हे सगळं कधीनाकधी आपल्या मनात येऊन गेलेलंच असतं. या क्षेत्रांत येणं , काम करणं आणि त्या वलयात राहूनही स्वतःचं वैयक्तिक आयुष्य वेगळं ठेवणं त्याचा समतोल राखणं अशी तारेवरची कसरत उत्तमरित्या सांभाळणं खरच खूप आवाहनात्मक आहे.बरेच दिवसांपासून या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या parenting विषयी एक एपिसोड करावा असं खूप मनात होतं . कसे पेलत असतील ते ही जबाबदारी कशा पद्धतीने वाढवत असतील आपल्या मुलांना या सगळ्या त्यांच्या व्यापातून त्यांची खऱ्या आयुष्यातली एक पालक म्हणून भूमिका काय असेल असे अनेक प्रश्न होते मनात आणि त्यांचीच उकल करावी यासाठी जेव्हा विचार सुरु झाला तेव्हा एकच व्यक्ती डोळ्यासमोर आली आणि त्यांनाच या एपिसोड साठी आणायचं असं क्षणात ठरवलं आणि ते म्हणजे        किरण दादा अर्थात किरण यज्ञोपवित चला तर मग जाणून घेऊया “भूमिका : पडद्यामागच्या पालकाची” आपल्या सेल्फलेस पेरेंटिंग च्या आजच्या भागातून

  • Encouraging Endorsements series - 8 Sameer Samudra
    2 min 3 sec

    Selfless Parenting या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आपल्या आमंत्रित पाहुण्यांना , मित्रमैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं याविषयी तुम्ही देखील तुमच्या ध्वनिमुद्रित प्रतिक्रिया आमच्याकडे नोंदवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ आम्हाला shini3015gmail.com वर mail करा... निवडक  feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दिली जाईल वाट बघतीये तुमच्या प्रतिसादाची , नक्की पाठवा. Appreciation always appreciated

  • 'Gem' of a Parent - Dr. Saurabh Gadgil [MD & Chairman - PNG Jewellers] Ep.20
    30 min 39 sec

    Think Pure ही tagline वाचली किंवा ऐकली की एकच नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे P.N.Gadgil Jewellers या नावाला प्रस्थापित केलं ते दाजीकाका गाडगीळ यांनी .. एका पेढीपासून सुरु झालेला हा प्रवास देशविदेशांत ३५ शाखांपर्यंत वाढवण्याची धुरा पेलली ती त्यांच्या नातवाने अर्थात डॉ. सौरभ गाडगीळने या तीन पिढ्यांच्या व्यवसायाबरोबरच या कुटूंबियांनी त्यांच्या मूल्य आणि सामाजिक उत्तरदायीत्वाच्या जाणिवेतून अनेक आदर्श निर्माण केले. इतका मोठा व्याप सांभाळणं, वाढवणं हे आव्हानात्मक आहे पण हे आव्हान सौरभने फक्त लीलया पेललं च नाही तर त्याच्या कारकीर्दीतून सिद्धही करून दाखवलंय की शुद्ध विचार काय किमया करू शकतात याच सगळ्या पार्श्वभूमीवर विचार करत असताना जाणवलं की, यामागे खूप सकारात्मक पद्धतीने केल्या गेलेल्या पालकत्वाचं strong foundation असलं पाहिजे. एक मूल म्हणून त्याची स्वतःची जडणघडण आणि एक पालक म्हणून तो करत असलेलं मुलांचं upbringing या बद्दल जाणून घेण्याचं प्रचंड कुतूहल निर्माण झालं त्याला आपल्या पॉडकास्ट वर बोलवावं आणि बोलतं करावं अशी इच्छा निर्माण झाली. जेव्हा याबाबतीत त्याच्याशी बोलणं झालं तेव्हा त्याने खूप positively त्याला मान्यता दिली आणि त्याचीच परिणीती आपल्या या आजच्या एपिसोड मध्ये झाली सौरभ सारख्या प्रतिथयश आणि तितक्याच उत्तम वडील असणाऱ्या व्यक्तीच्या पालकत्वाचा प्रवास उलगडणारी ही पहिलीवहिली मुलाखत घेण्याची संधी मला लाभली, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे तुम्हीही खूप उत्सुक आहात ना .. चला मग भेटूया आणि जाणून घेऊया या Gem of a Parent विषयी त्याच्याचकडून...

  • Experience 'Enriched' Parenting !! with Dr. Dinesh Nehete [Parenting coach & Founder Director :En-reach Foundation] Ep.22
    46 min 43 sec

    मुलांना समजून घेणं म्हणजे नेमकं काय त्यांचं नैसर्गिक वर्तन समजून घेऊन कसा बदल केला तर मूल आणि आपण छान आनंदी राहू शकतो फक्त IQ नाही तर EQ सुद्धा का महत्वाचा असतो मुलांच्या सर्वांगीण विकासात पालक आणि शिक्षक यांनी भावनिक साक्षर असणं का गरजेचं आहे मुलांशी वागता बोलताना त्यांच्या आणि आपल्या भावनांचा स्विकार करणं का गरजेचं आहे या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी घेऊन आली आहे Parenting coach आणि Enreach foundation चे संस्थापक डॉ.दिनेश नेहेते सरांना नेहेते सर त्यांच्या या फौंडेशन च्या माध्यमातून पालकत्व या विषयावर खूप मौलिक काम करत आहेत .शिक्षक आणि पालक यांना उत्तम पिढी घडवण्यासाठी सक्षम करण्याचं काम Enreach Foundation करते. त्यांच्या या कामाचा फायदा आजवर जवळजवळ १८००० पालक , ३५०० मुलं आणि महाराष्ट्रातल्या जवळपास ४५ शाळांना झालाय मानसशास्त्रातील अनेक अभ्यासक्रम पूर्ण करून कॉर्पोरेट क्षेत्रातील करियर sacrifice करून, ते सध्या त्यांच्या संस्थेमार्फत parenting coach आणि counselor म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या गाढ्या अनुभवाचा फायदा तुम्हा सगळ्यांना नक्कीच होईल या आशेने आणि खात्रीने आज त्यांना आपल्या या पॉडकास्टवर आमंत्रित केलंय. बाकी त्यांच्याविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी आता त्यांच्याचकडून ऐकूया आजच्या Experience Enriched Parenting या एपिसोड मध्ये

  • व्यसनाधीनता पालकांची...परवड मुलांची... ऐकूया दुसरी बाजू !!! - with Mrunmayee Agnihotri [Psychologist & Facilitator - IPH Thane] Ep.23
    47 min 30 sec

    प्रत्येक एपिसोड मधून वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पालकत्व उलगडण्याचा सतत प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या Selfless Parenting या आपल्या मराठी पॉडकास्ट च्या माध्यमातून मी तुमची होस्ट शिल्पा आज पुन्हा एकदा एक वेगळा आणि नवीन perspective घेऊन आलेय घरात असलेल्या ADDICTION या गोष्टीचा मुलांवर कसा परिणाम होतो ते यामध्ये कसे भरडले जाऊ शकतात त्यांच्या मनात अशा वातावरणामुळे काय आंदोलनं निर्माण होतात त्याचे त्यांच्या व्यक्तिमत्वावर आणि आयुष्यावर काय आणि कसे पडसाद उमटतात अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दयायला आज आपल्याबरोबर अशाच परिस्थितीला एक मूल म्हणून सामोरी गेलेली आणि त्यातून खूप सकारात्मक पध्दतीने बाहेर येऊन स्वतःवरच नाही तर अशा परिस्थितीतून जाणाऱ्या सगळ्या मुलांसाठी काम करणारी आणि त्यांच्या मदतीसाठी IPH या संस्थेमार्फत अंकुर नावाचा मदतगट चालवणारी मृण्मयी अग्निहोत्री मृण्मयी आज आपल्यासोबत ती दुसरी बाजू शेयर करणारे जी खूप जास्ती महत्वाची आहे ... मुलांची बाजू व्यसनाधीन व्यक्तींच्या मुलांसाठी काम करणारी , त्यांच्यासाठी मदतगट चालवणारी मृण्मयी मुलांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून खूप छान बोलतं करते आणि या विषयावर तिच्या युट्युब वरच्या व्हिडीओज मधून खूप छान बोलतेही चला तर जाणून घेऊया तिच्याचकडून या दुसऱ्या बाजू विषयी आपल्या सेल्फलेस पॅरेंटिंगच्या आजच्या भागात. 

  • Raising & Rising Healthy [World Health Day special episode] - with Dr. Shilpa Chitnis-Joshi [Gynecologist & Obstetrician]- Ep. 24
    39 min 56 sec

    आजच्या जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून पालकत्वाच्या अनेक कंगोऱ्यांमध्ये पालक आणि बालक दोघांनीही शारीरिकदृष्ट्या सुदृढ आणि सक्षम असणं का गरजेचं आहे यावर आधारित असणाऱ्या, सेल्फलेस पेरेंटिंग या आपल्या मराठी पॉडकास्ट च्या आजच्या भागात मी तुमची होस्ट शिल्पा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते होणाऱ्या आणि झालेल्याही पालकांनी स्वतःच्या आणि मुलांच्या आरोग्य , समस्या आणि उपाय याविषयी जागरूक असणं का गरजेचं आहे गेल्या काही वर्षात चुकीच्या जीवनशैलीमुळे नेमकं काय नुकसान होताना दिसतंय पालकत्व स्वीकारताना आणि निभावताना कुठल्या वैद्यकीय निकषांवर स्वतःला तपासणं आणि मुलांच्याही बाबतीत सजग असणं सध्याच्या काळात किती महत्वाचं आहे या आणि अशा अनेक बाबींवर आज आपण चर्चा करणार आहोत.. आज या विषयावर मार्गदर्शन करायला पुण्यातील एक प्रख्यात डॉक्टर म्हणून सर्वश्रुत असणाऱ्या एका खूप humble आणि friendly personality ला घेऊन आलेय , डॉ. शिल्पा चिटणीस जोशी सुप्रसिद्ध स्त्री रोग व प्रसुती तज्ञ.. लंडन येथून IVF तंत्रज्ञानाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेल्या डॉ. शिल्पा एक निष्णात डॉक्टर आहेत. त्याचबरोबर त्या एक उत्तम लेखिका सुध्दा आहेत डॉक्टर... एक विचारू हे महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्या या विषयावरचं त्यांचं पुस्तकही प्रकाशित झालंय.तेव्हा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जास्तीतजास्त लोकांमध्ये शेयर करायला विसरू नका हा एपिसोड

  • Encouraging Endorsements series - 10 - Prasad Manerikar
    2 min 45 sec

    Thanks for this appreciation Prasad Dada Selfless Parenting या माझ्या पालकत्वावर केंद्रित असणाऱ्या मराठी पॉडकास्ट बद्दल आमंत्रित पाहुण्यांना, मित्रमैत्रिणींना आणि अर्थात तुम्हा सगळ्या श्रोत्यांना काय वाटतं हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. तुम्ही देखील तुम्हाला माझा हा प्रयत्न कसा वाटतो याविषयी तुमच्या ध्वनिमुद्रित/लिखित प्रतिक्रिया पाठवू शकता. तुमच्या नावासहित रेकॉर्ड केलेला तुमचा ऑडिओ किंवा लिखित प्रतिसाद  shini3015gmail.com वर पाठवा... निवडक feedbacks ना आपल्या या प्लॅटफॉर्म वर प्रसिद्धी दिली जाईल वाट बघतीये.. Appreciation always appreciated  

  • मुलांची "शाळा" घेताय ... ?!! with Rajiv Tambe [ Children's Writer & Editor ] Ep. 26
    45 min 33 sec

    २ वर्षांच्या मोठ्या गॅप नंतर मुलं पुन्हा शाळेत जाऊ लागली आहेत .. पण यावेळची परिस्थिती बरीच वेगळी आहे... एका मोठ्या महामारीला आपण सगळेच सामोरे गेलोय त्याचे परिणाम भोगलेत किंवा येणाऱ्या काळात कदाचित ते नव्यानेही जाणवतील.. विशेषतः मानसिक दृष्टीने .. कळते सवरते असून आपली अशी अवस्था तर मुलांचं काय ती तर बिचारी अनेक गोष्टींपासून अनभिज्ञच आहेत .. याच नाजूक काळात त्यांना आणि स्वतःला कसं सांभाळायचं त्यांच्याशी कसं वागायचं त्यांची मदत कशी करता येईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आज आपल्याबरोबर आहेत राजीव काका अर्थात राजीव तांबे एक बाल साहित्यकार म्हणून ते जेवढे सुपरिचित आहेत तेवढेच ते उत्तम शिक्षक आणि मार्गदर्शकही आहेत कोविड सारख्या एका वेगळ्याच आणि गंभीर परिस्थितीतून बाहेर पडत पुन्हा हा शाळांकडे,अभ्यासाकडे परतण्याचा प्रवास सुरु करताना मुलांबरोबरच पालक आणि शिक्षकही तेवढेच बावरले आहेत.. साशंक आहेत आणि या सगळ्याशी deal करताना काय केलं पाहिजे काय टाळलं पाहिजे मुलांना कसं हाताळलं पाहिजे अशा अनेक गोष्टींवर त्यांच्या खास आणि खुमासदार शैलीत  झालेल्या गप्पा खास तुमच्यासाठी...तेव्हा नक्की ऐका, follow आणि share करा आपल्या या मराठी पॉडकास्टला  

  • EveryBodyCanDo [EBCD] Math !!! - Geeta Mahashabde [Director- Navnirmiti Learning Foundation] Ep. 29
    46 min

    EBCD Math i.e. everybody can do math New Episode of Selfless Parenting that tells about an organization Navnirmiti Learning Foundation which works in the field of developing maths science books, learning toys equipments.

Language

English

Genre

Educational

Seasons

1