
दिलीपराज प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या व सांत्वना शुक्ल ने कथन केलेला हा पॉडकास्ट आहे शाळकरी मुलांच्या गोष्टींचा . हा पॉडकास्ट योगेश सोमण यांच्या खोड्या आणि इतर कथा या पुस्तकावर आधारित आहे यात खोडकर मुलांच्या गमतीदार गोष्टी आहेत .पिंट्या , झिपऱ्या ,चिन्या,रघ्या, बाप्पा, ढब्ब्या ,गुड्डी यांच्या उपदव्यापी गॅंग मधले सगळेजण दिवसभरात काही न काही खोड्या करत असतात . या कथांमधून त्यांच्या निरागस खोड्यांचे वर्णन आहे .सर्वच वयाच्या श्रोत्यांना त्या आवडतील . मुलांना करमणुकीचा तर मोठ्यांना आठवणींचा आनंद घेता येईल.
मुलांच्या खोड्यांमुळे अन बालकनीत नारळ पडल्याने शेजारचे आजी आजोबा खूप रागावतात . सोसायटीच्या मीटिंग मध्ये तक्रार करतात . नंतर कॉर्पोरेशन ची माणसे सोसायटी मधील दोन झाडे तोडायला येतात तेव्हा मुलांना फार वाईट वाटते . कारण ती झाडे म्हणजे मुलांचे मित्रच असतात पिंट्या तर मनातल्या मनात सॉरी म्हणतो त्या झाडांना अन त्यावर राहणाऱ्या पक्षांना
English
Kids & Family
1